(गणपतीपुळे /वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा रत्नागिरी ( मीराबाई आंबेडकर प्रणित) दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया इंडिया (मोकळे गट) या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या दीपस्तंभ वाद्यवृंद या बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनपर कार्यक्रमात उपस्थित गायकांनी मोठी रंगत आणली. तसेच या प्रबोधनपर कार्यक्रमातून उपस्थित गायकांनी बुद्ध भीम गीतांवर आधारित विविध बहारदार गीते सादर करून वैचारिक जनजागृती केली. यामध्ये स्पेशल सेलिब्रिटी म्हणून सहभागी झालेल्या प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका कोमल धांडे, प्रसिद्ध गायक प्रवीण डोणे, सुप्रसिद्ध गायक गौरव पगारे, प्रसिद्ध गायक विद्यासागर आदींनी आपल्या बहारदार आवाजातून गायलेल्या बुद्ध भीम गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. तसेच त्यांनी खऱ्या अर्थाने या गीतांमधून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि धम्माबाबत प्रबोधन केले.
यावेळी या कार्यक्रमाचे गायक व निवेदक आणि मुंबई येथील हर्षद कांबळे निर्मित व दिग्दर्शित हा प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी गायक व निवेदक हर्षद कांबळे यांनी आपल्या बहारदार निवेदनातून महामानव डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील खडतर प्रसंग सांगत बाबासाहेबांचे विचार समाजाने कशाप्रकारे अंगीकृत केले पाहिजेत आहेत हे आपल्या कार्यक्रमातून पटवून दिले. यावेळी त्यांनी खऱ्या अर्थाने जनजागृती आपल्या बहारदार निवेदनाद्वारे केली. या कार्यक्रमात त्यांचा व त्यांच्या ग्रुपचा सन्मान संयुक्त संस्थांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी विचार मंचावर बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी तथा संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार यांचेसह भारतीय बौद्ध महासभा व दी बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया या तीनही संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. तसेच या तीन ही संस्थांच्या गाव शाखांतील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1