(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी 80 च्या दशकात वाघाची शिकार केली होती, असा धक्कादायक दावा केला आहे. त्याच्या गळ्यात असणारा दात हा त्या वाघाचा आहे, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना-यूबीटी गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाने यासंदर्भातील व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओने महाराष्ट्राच्या राजकारणात ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
शिवजयंतीनिमित्त सोमवारी बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमात शिवसेना आमदार संजय गायकवाड सहभागी झाले होते. यावेळी ते खास पोशाखात दिसले. याच कार्यक्रमात संजय गायकवाड यांनी गळ्यात मोत्यांच्या माळा व्यतिरिक्त एक दात घातला होता. याबद्दल त्यांना प्रश्न विचारला असता संजय गायकवाड यांनी दावा केला की, हा वाघाचा दात आहे. 1987 मध्ये मी वाघाची शिकार करून त्याचे दात काढले होते.
संजय गायकवाड हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. प्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती म्हणजेच 19 फेब्रुवारीचा आहे. वास्तविक, वाघाची शिकार भारतात बेकायदेशीर आहे आणि 1987 पूर्वीही ती बेकायदेशीर घोषित करण्यात आली होती. अशा परिस्थितीत गायकवाड यांचा दावा खरा ठरल्यास ते कायदेशीर अडचणीत येऊ शकतात.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गायकवाड यांनी गळ्यात एका जनावराचा दात घातल्याचे दिसत आहे. या दाताबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, हा दात वाघाचा आहे. मी १९८७ मध्ये एका वाघाची शिकार केली होती. त्याच वाघाचा हा दात आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशीचा असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मुखपत्र असलेल्या ‘सामना’ च्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ लागू झाल्यानंतर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली. भारतात वाघांच्या शिकारीवर १९८७ पूर्वीच बंदी घालण्यात आली. वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ मध्ये वाघांना आययूसीएनच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या लाल यादीत संकटग्रस्त म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना पहिल्यांदा दोषी ठरल्यास तीन ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांपासून दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यानंतर दोषी आढळल्यास किमान सात वर्षांचा तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपासून पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
1987 ला मी वाघाची शिकार केली. तो दात माझ्या गळ्यात आहे"आमदार संजय गायकवाड यांची शिवजयंतीच्या कार्यक्रमात धक्कादायक कबुली#Sanjaygaikwad #Viralvideo #Saamanaonline pic.twitter.com/ssn4u0izdp
— Saamana (@SaamanaOnline) February 22, 2024