(जाकादेवी /वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील ग्रंथपाल सौ. नेहा दत्तात्रय गोताड, जाकादेवी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री. संतोष रामचंद्र पवार तसेच बळीराम परकर विद्यालय मालगुंड येथील सहाय्यक शिक्षक श्री. भिमराव अर्जुन पवार यांचा शिक्षण संस्थेतर्फे उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.
सदरचा सत्कार समारंभ मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे उपक्रमशील व धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेने संपन्न झाला .यावेळी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष संदीप कदम, संस्थेचे सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संचालक किशोर पाटील, संचालक रोहित मयेकर, शिक्षण संस्थेचे सल्लागार कोल्हापूर येथील प्राध्यापक श्री.उमेश अपराध, सल्लागार नंदकुमार यादव, सल्लागार विलास राणे, रजत पवार, प्राचार्या सौ. स्नेहा पाल्ये,जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. नितीन मोरे, मालगुंडचे मुख्याध्यापक श्री.बिपीन परकर, पर्यवेक्षक श्री. शाम महाकाळ, पर्यवेक्षक श्री. उमेश केळकर काजुर्ली शाळेचे मुख्याध्यापक आशिष घाग,देऊडचे मुख्याध्यापक श्री. श्रीशैल्य पुजारी,माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम, नामदेव वाघमारे,माजी सरपंच सुवेज कांबळे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते श्री. संभाजी गणेशकर, प्रकाश कांबळे,कला अध्यापक संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम दरवजकर,पालक प्रतिनिधी सौ.उमा देसाई आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी विद्यालय, मालगुंड विद्यालय, काजुर्ली विद्यालय व चाफे महाविद्यालय व विविध संस्था तसेच परिसरातील मित्र मंडळ हितचिंतक, सत्कारमूर्तींचे नातलग व कुटुंबीय यांच्यावतीने सौ.नेहा गोताड , ज्येष्ठ शिक्षक संतोष पवार, भिमराव पवार व कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व हितचिंतक यांनी सत्कारमूर्तींविषयीची विशेष गुणवैशिष्ट्ये कथन करून त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सदरचा कार्यक्रम पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मालगुंड येथील अमित जाधव यांनी केले.
प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री. नितीन मोरे यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक श्री. शाम महाकाळ यांनी मानले.यावेळी सत्कारमूर्तींनी शिक्षण संस्था व शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी पायलट कॅप्टन साहिल प्रशांत जाधव,लोको पायलट ओजस संतोष पवार यांचा शाळा व शिक्षण संस्थेच्या वतीने चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी विशेष गौरव केला.