(रत्नागिरी)
आशिया आंतरराष्ट्रीय कल्चरल रिसर्च युनिव्हर्सिटी च्या वतीने (IAO-USA) माध्यमिक विद्यालय वरवडे ,भागशाळा व श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील क्रीडा शिक्षक श्री राजेश महादेव जाधव यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. हा सन्मान त्यांना सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्राप्त झाला आहे. सदर पदवीदान समारंभ तामिळनाडू राज्यातील होसूर शहरात नुकताच संपन्न झाला.
या पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मास्टर व्ही. बाबू विजयन, संस्थापक आणि मुख्य प्रशिक्षक- सल्लागार मंडळ, डॉ.के.ए. मानोकरन माजी आमदार तामिळनाडू कार्याध्यक्ष -(इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस),डॉ.जे. हरिदोस सेवानिवृत्त (सहायक न्यायाधीश, ए.पी. )डॉ. एस. घानसेकर,पोलीस निरीक्षक, कृष्णगिरी,डॉ.कुमार गुरू मा. केंद्र सरकारचे वकील, अधिवक्ता, कर्नाटक उच्च न्यायालय, बंगलोर , डॉ.शिवाप्पा के.पी, नितेश शरण प्रदेशाध्यक्ष-भाजपा समर्थक मंच, डॉ.गुणवंता मंजू कन्नड चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक, श्री श्री स्वामीजी. डॉ. एस. रविचंद्रन आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री जाधव यांना या अगोदर झी 24 तास वाहिनीचा अनन्य सन्मान अवॉर्ड 2013, सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र राज्य अवॉर्ड 2022 , महाराष्ट्र पत्रकार संघाचा राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे रत्नागिरी जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, भारत सरकार अंतर्गत रत्नागिरी जिल्हा नेहरू युवा पुरस्कार, मालगुंड एज्युकेशन सोसायटी रत्नागिरी संस्थेचा कै.सदानंद परकर स्मृती जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे रत्नागिरी संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, संवेदना सेवाभावी संस्थेमार्फत राज्यस्तरीय संवेदना पुरस्कार, स्वामी विवेकानंद सामाजिक सेवाभावी संस्था राज्यस्तरीय क्रीडाभूषण पुरस्कार, हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीचा रत्नागिरी जिल्हा गुणी शिक्षक पुरस्कार, आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ व प्रेस क्लब लांजेमार्फत कै.ग. रा. तथा भाई नारकर स्मृती जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल पत्रकार संघाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते गेली चौतीस वर्षे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे