(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने रत्नागिरीत 22 व 23 मार्च 2025 रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आह़े. या धम्मपरिषदचे उद्घाटन व चर्चासत्र 22 रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील गिरीरत्न हॉटेल सभागृह येथे होईल, तर 23 रोजी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे खुली धम्मपरिषद होणार आह़े. कार्यक्रमाला ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ड़ॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन ड़ॉ हरिश रावलीया व रिपोर्टींग ट्रस्टी चेअरमन अॅड़ सुभाष जौंजाळे यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आह़े, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिल़ी.
रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या गिरीरत्न हॉटेल येथे 22 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वा आदर्शांच्या प्रतिमांचे पूजन व भन्ते ए सुमेधबोधी यांच्या हस्ते उद्घाटन होईल़. दुपारी 12 व़ा भारतीय संविधान या विषयावर संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड जगदिश गवई यांचे मार्गदर्शन,1 व़ा भोजन, 2 व़ा ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतीमान कशी करावी या विषयावर राष्ट्रीय सचिव वसंत पराड यांचे मार्गदर्शन, 3 व़ा भारतीय रूढी-परंपरा आणि विज्ञान या विषयावर राज्य सरचिटणीस अशोक केदारे यांचे मार्गदर्शन, 4 व़ा बौद्धांचे धार्मिक विधी संस्कार काय करावे व काय करू नये याविषयी शंका समाधान व निरसन तर 6.30 ते 8 व़ा प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथे भन्ते ए सुमेधबोधी यांची जाहीर धम्मदेसना होणार आह़े.
तर 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10.30 व़ा शहरातील ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन त्याठिकाणाहून प्रमोद महाजन क्रीडा संकूल मैदान अशी भिक्खू संघाची धम्म रॅली, प्रमोद महाजन क्रीडा संकूल येथील धम्मपरिषदच्या ठिकाणी सकाळी 11 व़ा आदर्शांच्या प्रमिमांचे पूजन, भन्ते ए सुमेधबोधी यांचेकडून त्रिसरण पंचशील ग्रहण व मान्यवरांचे स्वागत व सत्कार, प्रमुख मार्गदर्शक व पुज्य भन्ते ए सुमेधबोधी यांची धम्मदेसना दुपारी 3 व़ा भोजनदान असे आयोजन करण्यात आले आह़े. धम्मपरिषदेसाठी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड़ एस़ के भंडारे, राष्ट़ीय उपाध्यक्ष अॅड़ एस़ एस वानखेडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा सुषमा पवार, राष्ट़ीय सचिव ब़ी एच़ गायकवाड, भिकाजी कांबळे, य़ु जी बोराडे, प्रशांत गडकरी, जयवंत लव्हांडे आदी उपस्थित राहणार आहेत़.
तरी जास्तीत जास्त लांकांनी या धम्मपरिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सरचिटणीस एऩ ब़ी कदम, कोषाध्यक्ष प्रदीप जाधव, उपाध्यक्ष विजय जाधव, ड़ॉ जनार्दन माहिते, शरणपाल कदम, राजापूर तालुकाध्यक्ष सत्यवान जाधव, लांजा तालुकाध्यक्ष आऱ ब़ी कांबळे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष विजय मोहिते, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राहूल मोहिते, चिपळूण तालुकाध्यक्ष जयरत्न कदम, गुहागर तालुकाध्यक्ष विद्याधर कदम, खेड तालुकाध्यक्ष अ़ के मोरे, दापोली तालुकाध्यक्ष अनिल धाडगे, मंडणगड तालुकाध्यक्ष हर्षद जाधव, तुषार जाधव, अंनत जाधव, राहूल पवार, भगवान जाधव यांनी केले आह़े