नुकतीच थंडी संपून आता उन्हाळा सुरु झाल्याचे जाणवत आहे. अशा वेळी उन्हापासून थंडावा मिळावा म्हणून लोक थंड पदार्थ खाणे पसंत करतात. तर उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी चांगलेच फायदेशीर आहे. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतात. नारळ पाणी पोटासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात. ते आपली तहान शमवण्यासाठी प्रभावी आहेत. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जाही मिळते.
अनेकदा कच्चा नारळ खरेदी करताना लोकांची फसवणूक होते. भरपूर पाणी असलेले नारळ ओळखणे अवघड काम बनते. नारळ विकत घेतांना त्यामध्ये पाणी अधिक आहे की मलाई हे सहसा समजत नाही, यासाठी अशा काही टिप्स आहेत जेणेकरून तुम्हाला नारळ विकत घेतानाच याबद्दलची माहिती असेल.
जेव्हा तुम्ही विक्रेत्याकडून नारळ खरेदी करता तेव्हा त्याच्या रंगाची काळजी घ्या. तुम्ही जे काही नारळ खरेदी कराल ते दिसायला हिरवे आणि ताजे असावे. ते जितके हिरवे आहे, याचा अर्थ ते नुकतेच झाडापासून तोडले गेले आहेत. अशा स्थितीत त्यात जास्त पाणी असण्याची शक्यता अधिक असते. जर नारळाचा रंग तपकिरी, पिवळा-हिरवा आणि हिरवट-तपकिरी असेल तर ते निवडू नका. अशा नारळात पाणी कमी आणि मलई जास्त असते.
जेव्हा तुम्ही नारळ खरेदी करता तेव्हा असा विचार करू नका की, मोठ्या नारळात जास्त पाणी येईल. वास्तविक, जेव्हा नारळाचे पाणी मलईमध्ये बदलू लागते, तेव्हा त्याचा आकार थोडा वाढतो. यासोबतच त्याची सालही कडक होते. त्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मोठ्या आकाराच्या नारळाऐवजी मध्यम आकाराचा नारळ खरेदी करा.
नारळ विकत घेताना कानाजवळ घ्या आणि जोमाने हलवा. त्यात पाण्याचा खळखळ असा आवाज येत असेल तर ते घेऊ नका. वास्तविक, जेव्हा नारळातून पाणी खळखळ आवाज येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यात मलई तयार होऊ लागली आहे आणि आतील पाणी कमी होऊ लागले आहे.
दुसरीकडे, जर नारळात खळखळ असा आवाज नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये मलई अद्याप तयार झाली नाही आणि ते पाणी भरले आहे, ज्यामुळे ते पाणी हलण्यासाठी जागा मिळत नाही. ज्या नारळातून पाण्याचा आवाज येत नसेल तो नारळ घ्या. कारण हे नारळ पूर्णपणे पाण्याने भरलेले असतात
सर्व प्रथम सरासरी आकाराचा नारळ निवडा. खूप मोठा किंवा खूप लहान नाही. नारळ जितका मोठा असेल तितके पाणी जास्त असेल असा विचार करू नका. कारण मोठे झाल्यावर पिकण्याची शक्यता जास्त असते. यामुळे त्यात मलाई बनण्याची शक्यताही वाढते आणि जेव्हा नारळात मलाई बनते, तेव्हा आपोआप त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते. कारण मलाई पाण्यापासून तयार होते. हा नारळाचा नैसर्गिक गुण आहे. त्यामुळे सरासरी आकाराचे नारळ निवडा.
नारळ पाणी पिण्याचे फायदे
1. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही
2. नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कारण वजन कमी करण्यासाठी सोडा आणि ज्यूस यांसारख्या इतर पेयांपेक्षा नारळ पाण्यात कमी कॅलरीज असतात. एक कप नारळ पाण्यात फक्त 48 कॅलरीज असतात. वजन कमी करण्यासाठी नारळपाणी उत्तम पर्याय आहे.
3. नारळ पाण्यामुळे तुमचा मधुमेहदेखील आटोक्यात राहण्यास मदत होते. नारळातील पाणी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास नारळपाणी फायदेशीर आहे
4 .तुम्हाला हृदयरोग ळायचा असेल तर तुम्ही नारळपाणी प्या.. कारण रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास नारळपाणी मदत करते. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे.
5 . जर तुम्हाला पचनक्रिया सुरळीत करायची असेल तर तुम्ही नारळ पाण्याचं सेवन करा,कारण पाण्यात भरपूर प्रमाणात मॅंगनीज असते जे तुमच्या आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात
6. जेव्हा तुम्हाला थकवा किंवा तणाव जाणवत असेल तेव्हा तुम्ही नारळ पाण्याचं सेवन करा. एक कप नारळ पाणी प्यायल्याने तुम्हाला रिलॅक्स आणि फ्रेश वाटेल.
7. नारळ पाणी प्यायल्यामुळे तुमची त्वचा तुकतुकीत राहते, चेहऱ्यावरील मुरुम , फोड कमी होण्यास मदत होते.
8. रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. आपले शरीर हायड्रेटेड राहते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही.