(रत्नागिरी)
ॲकेडमी अध्यक्ष भैय्याशेठ सांमत यांच्या मार्गदर्शनाखाली ॲकेडमी विविध उपक्रम राबवत असते. ॲकेडमी फिटनेस क्षेत्रामध्ये जागृती व नवनवीन खेळाडू घडवत असतानाच समाजाचे आपण काही देणे लागतो याच जाणिवेतून हेमंत जाधव यांची टीम सामाजिक कार्य करत आहे. याचीच दखल घेऊन जिल्हाधिकारी यांनी हेमंत जाधव यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच निवड केली आहे. यासाठी भैय्याशेठ सांमत यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. हेमंत जाधव यांचे सर्वस्तरातून अभिनंदन व शुभेच्छा मिळत असतानाच त्यांनी भैय्याशेठ यांचे विशेष आभार मानले आहेत. विशेष कार्यकारी अधिकारी पदी निवड झाल्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य करता येईल, असे जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.