(गणपतीपुळे / वैभव पवार)
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत उपकेंद्र गणपतीपुळे येथे आरोग्य केंद्र मालगुंड, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, समता फाऊंडेशन मुंबई व ग्रामपंचायत गणपतीपुळे यांचे सौजन्याने नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी 40 नागरिकांनी याचा लाभ घेतला.पैकी 7 रुग्ण मोतीबिंदू सदृश्य आढळल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली. त्यांची जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.
यावेळी आरोग्य उपकेंद्र गणपतीपुळे चे वतीने उपस्थित तीस वर्षावरील नागरिकांची समुदाय आरोग्य अधिकारी श्रीम.मानली तारये यांचेमार्फत वजन, उंची, ब्लड प्रेशर, व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी करण्यात आली या शिबिरात ग्रामपंचायत गणपतीपुळे च्या सरपंच कल्पना पकये, ग्रा. पं. सदस्य महेश केदार माजी सरपंच अशोक काळोखे व अन्य सदस्य उपस्थित होते.
सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य केंद्र मालगुंड च्या वैद्यकीय अधिकारी डॉ मधुरा जाधव व डॉ.सुनिता पवार यांचे मार्गदर्शना खाली आरोग्य सहाय्यक डॉ.परशुराम निवेंडकर यांनी विशेष मेहनत घेतली. या वेळी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. वर्षाराणी देशमाने तसेच समता फाऊंडेशन मुंबई चे वतीने नितेश शेट्ये उपस्थित होते. या शिबिरासाठी कार्यक्षेत्रातील आशासेविका, मदतनीस तसेच ग्रामसेवक प्रविण चौधरी यानी विशेष सहकार्य केले.