(सातारा)
साताऱ्यातील कराड तालुक्यात घडलेल्या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. कराड येथे एका तरुणाने आधी प्रेयसीला भेटायला बोलावले आणि नंतर तिला इमारतीवरून ढकलून ठार केले. ध्रुव छिक्कारने आरुषीला त्याच्या फ्लॅटवर बोलावल्यावर तिथे त्यांच्यात वाद आणि भांडण झाले. आरुषीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा ध्रुवला संशय होता. आरुषी आणि ध्रुवमध्ये झालेल्या वादावादीत तिचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप करत ध्रुवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिले. या झटापटीत प्रियकरही जखमी झाला असून त्याचाही पाय मोडला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी ध्रुवविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
साताऱ्यातील कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. दोन-तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. आरुषी आणि ध्रुव यांचे दिल्लीत एकत्र शिकत असताना पासूनचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांनी एकत्रच कराड मधील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ध्रुव छिक्कार कराड येथील मेडिकल कॉलेजजवळील इमारतीत ध्रुव भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.
दरम्यान, प्रेयसीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री 103 कलमाअंतर्गत ध्रुव वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ध्रुव मूळचा हरियाणा सोनीपत येथील तर आरुषी बिहार मुझफ्फरनगर येथील आहे.
उरण मधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना आता कराडमध्ये झालेल्या या हत्येमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण ऐरणीवर आला आहे. या सगळ्या प्रकरणांनंतर राज्य सरकारला महिलांच्या सुरक्षेसाठी काही विशेष उपयोजना करावी लागणार आहे.