(रत्नागिरी / प्रतिनिधी)
बिहारमधील तथागत बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा कब्जा प्रस्थापित करणारा बोधगया टेम्पल ॲक्ट (१९४९) रद्द करावा, या मागणीसाठी देशभरातील बौद्ध भिक्खूंनी आपले प्राण पणाला लावले आहेत. गेल्या काही दिवसापासून त्यांचे आकाश लामा यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू होते. त्यामुळे महाराष्ट्रातील बौद्ध बांधवांनी या मानवी लढ्याला साथ द्यावी, असे आवाहन आंबेडकरी चळवळीतून करण्यात येत आहे. यांचं अनुषंगाने रत्नागिरी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्फत बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.
सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हांला विश्वास आहे की तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली बिहार सरकार सुरक्षित आणि समृद्ध हातात आहे, तसेच बोधगया, राजगीर, नालंदा इत्यादी बौद्ध धर्माशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांचे सुशोभीकरण, पाटणा येथील बुद्ध स्मृती पार्क, महाबोधी केंद्र इत्यादी अनेक विकास कामांसाठी संपूर्ण देश तुमचे आभारी असल्याचे नमूद केले आहे. यापुढे, बोधगया मंदिर कायदा 1949, हा बिहार सरकारने संमत केलेला कायदा आहे, हा विधीमंडळाचा विषय आहे, आम्हाला आशा आहे की, तुमच्या नेतृत्वाखाली बिहारचे माननीय आमदार या कायद्याबाबत योग्य आणि सौहार्दपूर्ण तोडगा काढतील, जेणेकरून देशातील आणि जगातील बौद्धांना न्याय मिळेल. बुद्धगया महाविहार, बीटी बोधगया मंदिर अधिनियम 1949 च्या संदर्भात आपण संवैधानिक अधिकारांचे (अनुच्छेद 25 आणि 26) उल्लंघन लक्षात घेता, राज्याच्या कामकाजाच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाद्वारे न्याय आणि समानता दर्शविली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. महाबोधी महविहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे अधिकार सोपवावे अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे केली आहे.
दिलेल्या निवेदनाची प्रत भारताच्या राष्ट्रपती नोकरी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव य आंबेडकर यांना पाठविण्यात अली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, उपाध्यक्ष विजय जाधव, कार्यालयीन सचिव विजय कांबळे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष विजय मोहिते, संरक्षण विभागाचे सचिव राहुल पवार, संजय कांबळे संस्कार विभागाचे संजय कांबळे, सुनील पवार, शरद कांबळे, पी जी सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.