(नवी दिल्ली)
देशात ‘H3N2’ व्हायरस झापाट्याने पसरत असून कोरोनानंतर लोकांमध्ये दहशत दिसून येत आहे. या व्हायरसमुळे देशात दोघांचा बळी गेला आहे. केरळ आणि हरियाणा राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे केंद्र सरकार सतर्क झाले असून सरकारने देशात नवीन नियमावली जाहीर करत गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
H३N२ इन्फ्लूएंझाचा वाढता धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले आहे. नीती आयोगाने कोविड टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, राज्य आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आज महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्राने राज्यांना पत्र लिहीत कोविड प्रोटोकॉलचे पालन करा आणि मास्क वापरा, असा सल्ला दिला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरेसा निश्चित करावा, रुग्णांची तपासणी करावी, असं सांगितलं आहे.
नीती आयोगाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय –
- गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा.
- नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये
- शिंकताना, खोकताना तोंडावर रूमाल धरावा.
- ताप, सर्दी व अंगदुखीची लक्षणं आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या