(मुंबई)
महाराष्ट्रात कोरोनाच्या भीतीनंतर आता H3N2 व्हायरसच्या संसर्गाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मागील तीन दिवसांत राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये २३ वर्षीय तरुणाचाही समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. तीन जणांचा मृत्यू झाल्याने राज्य सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तात्काळ संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेतली. यानंतर राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहेत.
कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा अॅक्टीव्ह करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश खालीलप्रमाणे –
- गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे.
- सर्दी खोकला यासारखी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांच्या सल्यानुसार औषध घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरावा