(रत्नागिरी)
‘निर्भय बनो’ रत्नागिरीतर्फे कार्यकर्ता जनजागरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील जयस्तंभ येथील बाबासाहेब आंबेडकर सभागृहात २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता ही सभा होणार आहे. या सभेत ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत ज्ञानेश महाराव उद्बोधित करणार आहेत.
येत्या महिनाभरात राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत ‘निर्भय बनो’तर्फे परिवर्तनाचा जागर या कार्यकर्ता सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेच्या निमित्ताने ज्ञानेश महाराज यांचे विचार ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहेत. या सभेला रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक अभिजीत हेगशेट्ये, दीपक राऊत, कुमार शेट्ये, ॲड. अश्विनी आगाशे, बशीर मुर्तुझा, नौसीन काझी, राधा वणजू, विनोद वायंगणकर, सुकुमार शिंदे, पल्लवी सावंत, वाय. डी. पवार, विवेक घटविलकर यांनी केले आहे.