(मुंबई)
प्रभु श्रीराम, श्री स्वामी समर्थ आणि अन्य संतांविषयीविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे ज्ञानेश महाराव यांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी माफी मागितली आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी जाब विचारल्यानंतर त्यांनी माफी मागितली आहे. नवी मुंबई येथील वाशीत झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराव यांनी भाषण केलं होतं. या भाषणातले काही मुद्दे सोशल मीडियावर वायरल झाले होते. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी त्याविरोधार राज्यभरात आंदोलनं केली होती. भाजपचे दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या नेतृत्वाखालील चमूने ज्ञानेश महाराव यांच्या मुखातून माफी वदवून घेतली.
संभाजी ब्रिगेडचा राज्यस्तरीय मेळावा अलीकडे वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडला. या मेळाव्यात ज्ञानेश महाराव नामक व्यक्तीने प्रभु श्रीराम, सीतामाई, स्वामी समर्थ आणि ब्राह्मण समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्ये केली. त्याविरोधात हिंदूं धर्मिर्यांकडून तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला. हिंदू देवी-देवतांविषयी अशी वक्तव्ये ऐकून संतप्त झालेल्या दक्षिण मध्य मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी थेट महाराव यांच्या कार्यालयात धडक दिली आणि त्यांना माफी मागायला लावली.
दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्या नेतृत्वाखालील या चमूत नगरसेविका राजश्री शिरवडकर, जिल्हा महामंत्री विलास आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कनौजिया, जिल्हा सचिव आनंद भंडारी, जिल्हा महामंत्री पुष्पा आडारकर, वॉर्ड अध्यक्ष संतोष गुरव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप कार्यकर्ते राजेश शिरवाडकर यांनी ज्ञानेश महाराव यांना जाब विचारला, यानंतर ज्ञानेश महाराव यांनी माफी मागितली आहे. ज्ञानेश महाराव यावेळी म्हणाले, आम्ही ठरवलं असतं तर यांचं संपूर्ण तोंडही काळं केलं असतं, पण आमचे संस्कार, आमचा हिंदू धर्म हे शिकवत नाही. भविष्यातही हे जर काही बोलले तर मात्र आम्हाला साधू संतांनी जी शिकवण दिली आहे, नाठाळाच्या माथी हाणा काठी, त्यापद्धतीने तुम्हाला जाब विचारला जाईल, हे लक्षात ठेवा, असा इशाराही ज्ञानेश महाराव यांना राजेश शिरवाडकर यांनी दिला आहे.
काय म्हणाले ज्ञानेश महाराव?
माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. स्वामी समर्थांचे जे लाखो भक्त आहेत, माझ्या वक्तव्यामुळे त्यांना वाईट वाटलं, त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. भविष्यात प्रभू श्रीराम, स्वामी समर्थ किंवा अन्य कोणत्याही देवतेविषयी अपशब्द काढणार नाही, अशी कबुली देत ज्ञानेश महाराव यांनी या दुष्कृत्याबद्दल माफी मागितली.