(संगमेश्वर / प्रतिनिधी)
अनेक वर्षे गुरव, लिंगायत तसेच जंगम समाज आपल्या विकासापासून वंचित राहिला आहे. आपापसातील वाद, जाती-धर्म बाजूला ठेऊन एकत्र या, आपली मूठ आपल्या समाजाच्या विकासाकडे वाटचाल करेल. समाजात राजकीय, धार्मिक तेढ निर्माण करून काही व्यक्ती, संघटनेमध्ये, समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही समाज संघटना, सामाजिक कार्यकर्ते एक संघ करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु एखाद्या विषयाला चिकटून न रहाता एकत्र येऊन समाजाच्या विकासाला सामाजिक लढा देणे आवश्यक असल्याचे मत गुरव यांनी व्यक्त केले आहे.
समाजात तू भाविक, तू लिंगायत अशा अनेक प्रश्नांनी विखुरला जात आहे. असे न करता बुजुर्ग समाज मंडळींनी युवकांच्या मागे उभे राहून समाजासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या संघटना निर्माण करून समाजात तुकडे पडत आहेत. परंतु एकाच छताखाली या….आपल्या समाजाचा विकास करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व गुरव ज्ञाती समाजाचे सदस्य मनोहर गुरव यांच्यासह गुरव ज्ञाती समाज (शासन नोंदणीकृत 1953) चे निरीक्षक संतोषजी गुरव संजय गुरव, पुष्पकुमार गुरव मंगेश पवार, विनायक जाधव हे गुरव ज्ञाती समाज संस्थेचे विद्यमान निरीक्षक आणि, गुरव महोत्सव अध्यक्ष तसेच गुरव विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे.