(जाकादेवी /वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर कला व वाणिज्य महाविद्यालय चाफे येथे मानसिक ताण-तणाव व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मानसिक ताण तणाव व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथून प्रमोद शाक्य हे उपस्थित होते. प्रथम त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून मानसिकता म्हणजे काय ते सांगितले. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा आधार घेऊन जाणवणाऱ्या मानसिक समस्या त्यांनी सर्वांसमोर मांडल्या. तसेच मानसिक समस्यांवर मात करून आपल्या मनाचे व्यवस्थापन कसे करता येईल त्यांचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे सहाय्यक प्रवीण भोयर यांनीही आपल्या अनुभवातून चांगले मार्गदर्शन केले. यश प्राप्तीच्या मार्गासाठी विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. व त्यानुसार आपण स्व विकास साधू शकतो असे त्यांनी सांगितले.
मानसिक व्यवस्थापन मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी मधून प्रमोद शाक्य, प्रवीण भोयर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.