(जाकादेवी / वार्ताहर)
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे रत्नागिरी तालुक्यातील कापडगाव ग्रामपंचायत या ठिकाणी विद्यार्थांना मोफत वह्या वाटप आणि करिअर मार्गदर्शन शिबीर, महिलांना रोजगार संबधी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रारंभी जिजाऊ संस्थेबद्दल उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली. त्यावेळी संस्थेचे सचिव श्री केदार चव्हाण, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री प्रथमेश गावणकर, प्रकल्प संचालक श्री संदीप पाटील, जिजाऊचे सदस्य श्री मंदार नैकर, सरपंच श्री विघ्नेश कोत्रे, उपसरपंच सौ. सपना पेजे, ग्रामपंचायत सदस्य श्री नंदकुमार पाले, माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री शांताराम कोत्रे, श्री विश्वास कांबळे तसेच वाडीतील सर्व विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ, गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.