(गुहागर)
कोकणातील सुप्रसिद्ध खातू मसाले उद्योग समूहाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खातू मसाले उद्योग गुहागर समूहाचे मार्केटिंग मॅनेजर अमित गोताड व प्रतिनिधी उपस्थित होते. वैभववाडी येथे आयोजित जिल्हा व्यापारी एकता मेळाव्यात खातू मसाले उद्योग समूहाने खारीचा वाटा दिला आहे. खातू मसालेचा स्टॉल व्यापारी मेळाव्यात लावण्यात आला होता. या मेळाव्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, वैभववाडी अध्यक्ष तेजस आंबेकर, नितीन वाळके, नगराध्यक्षा नेहा माईणकर, संजय सावंत व व्यापारी उपस्थित होते.