(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्ञानाचा अथांग महासागर, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कळझोंडी पंचशील बुद्धविहार येथे माजी शिक्षण विस्तार अधिकारी व कार्यक्रमाचे अध्यक्ष -अनिलजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांच्या पुढाकाराने अभिवादन सभा पार पडली. प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेला अध्यक्ष अनिल पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.महिला मंडळाच्या अध्यक्षा-नलिनी पवार व मान्यवर पदाधिकारी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर कु.अनुप भि.पवार, रिना मंगेश पवार,सौ.प्रिशा प्रशांत पवार, नम्रता सि.पवार, सुशांत पवार, प्रबोध पवार, रोहित पवार , विद्यमान सभापती प्रकाश भागुराम पवार आणि शाखेचे अध्यक्ष आयु.अनिल पवार यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान जीवनकार्याची उपस्थितांना माहिती देऊन अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील व धार्मिक पूजापाठ बौद्धाचार्या सौ प्रिशा प्रशांत पवार, संघमित्रा दिनेश पवार यांचे नेतृत्वाखाली घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष आयु.संदीप पवार यांनी विशेष मेहनत घेतली.व सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले. व शेवटी मालगुंड येथील युवक शैलेश शरद पवार यांचे चार डिसेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यांना कळझोंडी शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.