(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी यांच्यामार्फत जाकादेवी देवस्थानची यात्रा व देवदिवाळी वार्षिक उत्सव सुरू झाला असून आज सोमवार २ डिसेंबर रोजी भव्य वार्षिक यात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
१ डिसेंबर ते ३ डिसेंबर या तीन दिवसीय कालावधीत जाकादेवी मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे. १ रोजी सकाळी ६ वाजता नित्य पूजा आरती ९ वाजता सहस्रनाम दुपारी १२ वाजता जाकादेवी दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सायंकाळी ७ वाजता नित्य पूजा व आरती असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता नित्य पूजा आरती, सकाळी ७ वाजता वार्षिक यात्रा उत्सवाला प्रारंभ झाला असून देवदर्शनासाठी जिल्हा परजिल्ह्यातून भाविकांची मोठी रीघ लागली आहे. दुपारी १२.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत खिचडी प्रसाद देण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता नित्य पूजा रात्री ८.३० वाजता आरती व भोवत्या, रात्री १० वाजता नमन स्थानिक गोताडवाडी सादर होणार आहेत.
मंगळवार दिनांक ३ रोजी सकाळी ६ वाजता नित्य पूजा आरती ,सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महिलांचे हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वा नित्य पूजा रात्री ८.३० वाजता आरती व भोवत्या, तसेच रात्री १०.३० वाजता दोन अंकी नाटक हीच तर प्रेमाची गंमत आहे, अशोक पाटोळे लिखित भाग्येश खरे दिग्दर्शित हा प्रसिद्ध नाट्य प्रयोग जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी निर्मित व सादरकर्ते श्रीरंग निर्मित रत्नागिरी यांच्यामार्फत सादर होणार आहे. तरी जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी ,श्री जाकादेवी देवस्थान मुंबई मंडळ व कुलस्वामिनी सेवा मंडळ व महिला मंडळ खालगाव देवस्थान वार्षिक महोत्सव यशस्वीसाठी मेहनत घेत आहेत.देवस्थान कमिटीतर्फे भाविकांची उत्तम सोय करण्यात आली आहे.