(मुंबई)
२७ नोव्हेंबर पासून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेस मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी सुकांत जावडेकर व सुप्रिया जावडेकर यांनी सुस्वर अशी नांदी गात नटराज पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आचार्य अत्रे रंगमंदिरचे माजी व्यवस्थापक व ज्येष्ठ रंगकर्मी गजानन कराळे, नाट्यपरिषद उपाध्यक्षा व ज्येष्ठ रंगकर्मी डोंबिवलीच्या भारती ताम्हणकर, अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष रवींद्र सावंत, कल्याण शाखेच्या बालरंगभूमी परिषद अध्यक्षा व अभिनेत्री सुजाता कांबळे, गायन क्षेत्रातील नामवंत कलाकार व सुरताल कराओके क्लबच्या संचालिका लीना घोसाळकर, दैनिक जनमतचे ज्येष्ठ पत्रकार व नाट्य समीक्षक बबलू दळवी, राज्य नाट्य स्पर्धेचे समन्वयक शिवाजी शिंदे, सांस्कृतिक कार्य संचालनाचे अधीक्षक संदीप वसावे तसेच यंदा नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून असलेले अमरावतीचे नाट्यदिग्दर्शक, नाटककार, नेपथ्यकार, नाट्य व्याख्याता सुरेश बारसे, सोलापूर येथील राज्य नाट्य स्पर्धेत नऊ नाटकांना दिग्दर्शन केलेले व अभिनयात तीन रौप्य पदक मिळाली आहेत असे राजा राजेशचंद्र व आठ ते दहा वर्ष राज्य नाट्य स्पर्धा त्यामध्ये दोन वेळा रौप्य पदक आणि प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, त्याचबरोबर झुंज वाऱ्याशी या व्यवसायिक नाटकाचे प्रयोग चालू आहेत अशा शोभना मयेकर श्रीरामपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती मंगला जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांचे शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले.
त्याचबरोबर अनुराग नाट्य संस्था कल्याण या संस्थेने पन्नास वर्षे पूर्ण केल्याबद्दल मेघन गुप्ते व अरविंद सरफरे तसेच कल्याण नाट्य परिषदेच्या उपाध्यक्षा प्रीती बोरकर, नाट्य परिषद आणि बाल रंगभूमी परिषद पदाधिकारी मीनल ठाकोर, ज्येष्ठ अभिनेते श्रीरंग दाते, अखिल भारतीय नाट्य परिषद कल्याण शाखेचे कोषाध्यक्ष हेमंत यादगिरे, सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक मंगेश नेहरे, नाट्यपरिषद कल्याण शाखेचे कार्यकारी सदस्य व मुंबई विद्यापीठ नाट्य विभागातील प्राध्यापक डॉ. प्रदीप सरवदे, सोनवणे कॉलेजच्या प्राध्यापिका व रंगकर्मी डॉ. अनुप्रिया खोब्रागडे यांचा देखील सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर गेली अनेक वर्षे नाट्य स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन करणारे शिवाजी शिंदे यांच्या सत्कार रवी सावंत व भारती ताम्हणकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
तर या उद्घाटन सोहळ्यात शिवाजी शिंदे यांनी प्रेक्षक, नाट्य स्पर्धक व नाट्य संस्था यांना संबोधताना असे सांगितले की कलाकार व संस्थांनी बक्षीस मिळणार नाही म्हणून नाट्यप्रयोग करायचे नाही असे त्यांचे मत काढून टाका, कारण ही नाट्यस्पर्धा रंगकर्मिंसाठी एक महोत्सव आहे, त्याकडे स्पर्धा म्हणून पाहू नका तर महोत्सव म्हणून पहा कारण अशा स्पर्धा भारतातील कोणत्याही राज्यात होत नाहीत मात्र महाराष्ट्र राज्य असे आहे की गेली ६३ वर्ष राज्यात कोणाचेही सरकार असू द्या पण या स्पर्धा चालू ठेवण्याचे कार्य सांस्कृतिक कार्य संचालनायातर्फे चालू आहे, आणि हे खरेच कौतुकास्पद आहे. म्हणून जास्तीत जास्त नाट्यसंस्थांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन शिंदे यांनी केले. व श्री बीबीशन चवरे साहेब, श्री खरगे साहेब, श्री पांडे साहेब यांना धन्यवाद दिले व अतिशय मेहनत घेऊन सर्वांना सहकार्य करणारे श्री मिलिंद बिरजे यांचे कौतुक केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील खांडेकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय गावडे, विशाल पितळे, सुनंदा जाधव, मनीषा साबळे, दिपाली पितळे, सचिन माने, लव क्षीरसागर, मेघा शृंगारपुरे, भूषण मेहेर, सई महेर, विशाल केंबुळकर, राजा परदेशी, दीपक नाईक, महेश गुजर, सिताराम शिंदे, सौरभ आरोटे, सुरेश शिर्के, सिद्धेश यादगिरे, प्रेमा सातपुते यांनी मेहनत घेतली. उद्घाटन सोहळ्यानंतर डोंबिवलीच्या श्री गणेश एज्युकेशन सोसायटीच्या बागी या नाट्यप्रयोगाने स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.