(संगमेश्वर)
शिव फुले शाहू आंबेडकर विचारांवर चालणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन भव्य बांधलेल्या जयभिम स्तंभाचे उद्घाटन केले. या सोहळ्याला प्रमुख उपस्थित वाशिष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष प्रशांत बबन यादव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, राजेंद्र ब्रीद, युवा नेतृत्व अजिंक्य ब्रीद, हेदली गावचे पोलीस पाटील नरेंद्र खानविलकर, तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रातील विशेष मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रशांत यादव त्यांनी तरुणांचे विशेष कौतुक केले. सुरज सावंत, रुपेश तांबे, विनोद सावंत, अभिजीत तांबे, सागर सावंत, सुदेश सावंत, सचिन गमरे, शुभम सावंत, अजय सावंत हे सर्व संघटनेचे कार्यकर्ते असून त्यांनी आपल्या हाताने भव्य जय भिमस्तंभ साकारला आहे.
तांबेडी बौद्धवाडीच्या विकास कामांवर या तरुणांचे विशेष लक्ष आहे. अशा तरुणांची समाजाला आणि गावाला गरज आहे असे मत प्रशांत यादव यांनी व्यक्त केलं. यावेळी भव्य जय भिम स्तंभाला विनामूल्य जागा दिल्याबद्दल महेश खामकर यांचे विशेष आभार मानण्यात आले
या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मंडळी आणि प्रशिक सेवा संघ तांबेडी या संघटनेचे कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते