(संगमेश्वर / एजाज पटेल)
पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या बँकेच्या सुवर्णं महोत्सव कार्यक्रमाला त्यावेळचे पाहिले शाखाधिकारी सुरेंद्र जोशी उपस्थित आहेत, हा शाखेसाठी खूप महत्वाचा क्षण असल्याचे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे यांनी संगमेश्वर शाखेच्या सुवर्णं महोत्सव कार्यक्रमावेळी काढले.
संगमेश्वर येथील बँक ऑफ इंडिया शाखेला 50 वर्ष पूर्ण झाल्याने सुवर्णंमहोत्सव कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन 26 डिसेंबर 1974 साली शाखा सुरु झाली त्यावेळी या शाखेचे पाहिले शाखाधिकारी असलेले सुरेंद्र जोशी, बँकेचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे, संगमेश्वर शाखाधिकारी अजीज पठाण, देवरुख शाखाधिकारी जाधव, कसबा शाखाधिकारी ऋषिकेश कुरणे, बँक युनियन अधिकारी किरण खोपडे, विनोद कदम, बँक मित्र निलेश कदम, सेवानिवृत्त कर्मचारी जनार्दन शिरगांवकर, भगवान यादव, दिपक घाग, गजानन रहाटे, अनंत सावंत, प्रभाकर सावंत, संगमेश्वर बाजारपेठ मधील व्यापारी स्वप्नील नारकर, गुरुप्रसाद भिंगार्डे, विवेक शेट्ये, राजेश नारकर, स्वरूप खातू, अजय भुरवणे, दिनेश आंब्रे, बाबू खातू, अजिंक्य शेट्ये, निल खातू, अमोल कापडी, श्रीकृष्ण खातू आदी ग्रामस्थ तसेच मोठ्या प्रमाणात बँकेचे विविध गावातील ग्राहक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित बँकेच्या ग्राहकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बँकेचे विभागीय अधिकारी नरेंद्र देवरे पुढे म्हणाले, पन्नास वर्षात शाखेने चांगलीच प्रगती केली. बँकेचे डिपॉजिट आणि लोन विभाग अशी विभागणी करून पुढे जात असताना पन्नास वर्षात शाखेने पन्नास कोटी डिपॉजिट केले असल्याचे बोलताना यापुढे बँकेची चांगली प्रगती करून ग्राहकांना जास्तीत जास्त समाधानकारक कशी सेवा देता येईल याकडे लक्ष दिले जाईल, असे वचन देताना आजपर्यंत ग्राहकांनी साथ दिली तशी साथ कायम द्यावी अशी विनंती केली.
शाखाधिकारी अजीज पठाण यांनी बोलताना बँकेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाले हा पन्नास वर्षाचा मोठा काळ असून त्यावेळी शाखेचे आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले जोशी साहेब त्यांच्यासमोर त्यावेळी असलेले लहान मुलंही आज म्हातारे झालेत हा जसा बदल आहे तसाच बँकेत सुद्धा बदल झाला आहे. जोशी सरांनी त्यावेळी लावलेल्या रोपट्याचे आज मोठया वृक्षात रूपांतर झाले असल्याचे बोलतानाच बँकिंग हा विश्वासाचा काम असून जर ग्राहकांचा विश्वासच नसेल तर बँक चालणार नाही. आज पर्यंत विश्वास असल्यामुळे बँक नावारूपास आली असून असाच विश्वास ग्राहकांनी कायम ठेवण्याची त्यांनी विनंती केली.
बँक मित्र म्हणून गेली काही वर्ष प्रामाणिक काम करणारे निलेश कदम यांनी बँकेच्या 50 वर्षाच्या कालावधीत जीवन सुरक्षा योजनेचे 74 दावे (क्लेम) केल्याने त्याची दखल पंतप्रधान कार्यालयाला घेणे भाग पडले. त्यामुळे निलेश कदम यांचा विभागीय अधिकारी नरेंद्र देवरे यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार यावेळी करण्यात आले
यावेळी अजिंक्य शेट्ये, दिनेशआंब्रे, श्रीकृष्ण खातू आदींनी मनोगत व्यक्त करताना बँकेकडून मिळणाऱ्या समाधाकारक सेवेबद्दल आभार व्यक्त केले. पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापण्यात आला. बँकेला सजावट तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेच्या महिला कर्मचारी अवंतिका यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखाधिकारी अजीज पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.