(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुबंई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवर संगमेश्वर येथे गोव्याच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पो आणि दुचाकी यांचा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकी थेट आयशर टेम्पोच्या पुढील भागात जाऊन घुसली. अपघाताची भीषणता पाहता दुचाकी चालकाचे काय झाले असेल, हीच चर्चा होती. मात्र काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल. 79 वर्षीय हशमत अली अहमद कापडी या दुचाकी चालकाने पुढील गांभीर्य ओळखून जीव वाचवण्यासाठी दुचाकी सोडून रस्त्याच्या बाजूला उडी मारली. म्हणुन ते बचावले.
गोव्याच्या दिशेहून येणारा आयशर टेम्पो MH01EE1851 चालक निझाम अहमद सफीउल्ला खान (उत्तर प्रदेश )हा मुबंई च्या दिशेने जात असताना कसबा येथील हशमत अली अहमद कापडी (वय वर्ष 79) हे आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक MH08AC/2459 घेऊन संगमेश्वर येथे जात असताना संगमेश्वर एसटी स्टँड पासून जवळ असलेल्या सॉमिल समोर अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेड कॉन्सटेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून महामार्गांवर दोन्ही बाजूला खोळंबलेल्या वाहनांसाठी मार्ग खुला करून देण्यास मदत केली.