(खेड / भरत निकम)
तालुक्यातील घाणेखुंट गवळीवाडा येथे गावठी हातभट्टी दारूधंद्यावर टाकलेल्या धाडीत १७३० /- रुपये किंमतची १६ लिटर गावठी हातभट्टी दारू पोलिसानी जप्त केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २३ जुलै रोजी करण्यात आली. विजय उर्फ बाबू लक्ष्मण महाडीक ( वय – ४३ ) असे त्या गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. गैरकायदा विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू ही आपले स्वतःचे तांबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.