(तरवळ /अमित जाधव)
संकल्प विकास संस्था व पंचायत समिती रत्नागिरी आणि जयगड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थिनींना जेंडर प्रशिक्षण बुधवार दिनांक २६ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता सदानंद बळीराम परकर सभागृहात पार पडले.
संकल्प विकास संस्था ही तालुक्यातील शालेय विद्यार्थिनींसाठी कार्य करीत आहे. संस्थे मार्फत मुलींसाठी व्यवसाय मार्गदर्शन, आरोग्यविषयक जागृती, कौशल्य विकास कार्यक्रम अशा अनेक प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. तसेच या संदर्भातील विविध प्रकारची उपयुक्त माहिती संकल्प विकास संस्थेच्या अध्यक्ष कांचन नागवेकर यांनी उपस्थित मुलींना दिली.
तसेच जयगड पोलीस ठाणे येथील अधिकारी (API )कुलदीप पाटील यांनी सायबर गुन्ह्यासंबंधित माहिती व ते कसे थांबवता येतील या साठी आपण कोणती भूमिका घेतली पाहिजे याची सविस्तर माहिती दिली. व आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता सतर्क राहिले पाहिजे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य अधिकारी डॉ मधुरा जाधव यांनी मुलींना आरोग्य विषयक माहिती दिली वाढत्या वयाबरोबर आपण आपली शारीरिक सुरक्षा कशा पद्धतीने करावी या विषयी सखोल माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रशालेतील इयत्ता ५वी ते ९आणि इयत्ता ११च्या विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.
संकल्प विकास संस्था व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जेंडर प्रशिक्षण कार्यक्रमाला जयगड पोलीस ठाण्याचे अधिकारी (API) कुलदीप पाटील, तसेच त्यांच्या समवेत महिला पोलीस कॉन्स्टेबल अन्वी पुसाळकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव, संकल्प विकास संस्थेच्या अध्यक्ष कांचन नागवेकर, करबुडे गावच्या सरपंच संस्कृती पाचकुडवे, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक उमेश केळकर, मिलिंद सुर्वे, महिला शिक्षिका नेत्रा मोहित, नेहा परकर, श्रद्धा गंगावणे, पल्लवी गाडे उपस्थित होते.