(गावखडी / दिनेश पेटकर)
प्रतिवर्षाप्रमाणे गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिर, गावखडी येथील महाशिवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवा निमित्त व श्री देव रामेश्वर यांविषयी थोडक्यात…
शिव सांब भोळा नामे अनेक तुजला,
रामेश्वरा जिव खुळा झाला तुझ्या दर्शनाला…
निसर्गाची मुक्त उधळण असलेले, शांततेबरोबर पावित्र जपलेले एखादे स्थळ असते, अशी सर्व वैशिष्ट्ये रत्नागिरी तालुक्यातील सुप्रसिध्द देवस्थान श्री देव रामेश्वरला लागु होतात. रत्नागिरी शहरापासून सुमारे 24 कि.मी. अंतरावर श्री देव रामेश्वर हे शंकराचे देवस्थान आहे.
गावखडी गावाचे वैशिष्ट्ये म्हणजे धार्मिकतेचे स्वतंत्र्य अधिष्ठान लाभल़ेले हे गाव आहे. तर अनेक थोर व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि नाटयप्रेमी व खेळांमुळे गावखडी जगाच्या नकाशावर आले आहे. येथील पांडवकालीन आख्यायिका असलेले स्वयंभू देवस्थान श्री देव रामेश्वर या मंदिराच्या उत्सवाचे वैशिष्ट्ये म्हणजे नाटयप्रेमी व खेळाडूमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. येथील पांडवकालीन आख्यायिका असलेले स्वयंभू देवस्थान श्री देव रामेश्वर या मंदिराच्या उत्सवाचे विशेष वैशिष्ट्ये म्हणजे पाच दिवस सतत चालणाऱ्या या उत्सवात हिंदूबरोबर मुस्लिम बांधव सहभागी होतात.
उत्तरेला स्वयंभू सिध्दीविनायक मंदिर व महाविष्णुचे तसेच गरूडाचे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर दोन विहीर, तर कायमस्वरूपी रंगमंच कार्यालय आहे. श्रावणी सोमवारी सुयोदयापासून ते सुर्यास्त पर्यंत जप चालतो. येथे त्रिपुरारी पोर्णिमा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाशिवरात्र महोत्सवानिमित्त स्थानिक संघाचे क्रिकेटचे संघ, पुरुष संघ, महिला गट, लहान मुलांचे कबड्डी सामने तसेच महाशिवरात्र दिवशी हळदीकुंकू समारंभ आयोजन केले जाते. तर महाशिवरात्र सायंकाळी 7वा. भक्तगणाकडून 3ते5 हजार दिप पेटवून दीपोत्सव साजरा केला जातो.
महाशिवरात्री दिवशी 11 खांबाची व 21 पायली तांदुळाची महापूजा बांधण्यात येते. ही महापुजा बांधण्यासाठी भक्तगण मोठ्या भक्तीभावाने तांदूळ देतात, अशी महापुजा इतरत्र पाहवयास मिळणे दुमिळ आहे. या तांदूळाने बांधलेली महापुजा भक्तगणाचे आकर्षक असते. त्याप्रमाणे दरदिवशी नाटय प्रयोगांचे आयोजन केले जाते. शिवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण केले जाते. विविध स्पर्धां बरोबर कित़न, नवग्रह होम, महारूद, आरती भोवती सोहळा असे धार्मिक कार्यक्रम होतात. सतत पाच दिवस म्हणजे 120 तास हा महोत्सव साजरा केला जातो.
ओम नम शिवाय…ओम नम शिवाय…अशा मंत्रोच्चाराचा जप करीत… अपूर्व उत्साह आणि चैतन्यमय वातावरणात दरवर्षीप्रमाणे गावखडी येथील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री महोत्सवानिमित्त यावर्षीही भाविकांनी अलोट गर्दी करत श्रीक्षेत्र गावखडी भक्तीरसात चिंब भिजून गेली आहे. गावखडीतील श्रीदेव रामेश्वराचा शिवरात्री महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सर्व पदाधिकारी, शिवभक्त आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यातून मोठ्या भक्तिभावाने मांगल्य, एकोप्याने दिमाखात साजरा करण्यात येत आहे.
महाशिवरात्र महोत्सवात.ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचे पुजारी चे जबाबदारी लिंगायत मंडळी काम सांभाळतात. प्रतिवर्षी महाशिवरात्र उत्सवानिमित्त उपस्थित असलेल्या जनसमुदायाला येथील जत्रा विशेष आकर्षित करते. जत्रेतील दुकाने विविध प्रकाराने सजलेली असतात, बाहेरील व स्थानिक व्यापारी आपली दुकाने थाटात या जत्रेमध्ये थाटून हजारो रुपयांचा खरेदी -विक्री व्यवहार येथे होतो. वर्षातून एखादा भरणारी जत्रा ग्रामीण जनतेला आनंद देणारी एक पर्वणीच असते.
कार्यक्रम :
दि.26 फेब्रुवारी रोजी पहाटे 5वा. लघुरूद, शिवपुजा, स.8वा. क्रिडा स्पर्धा, स. 9वा. शिवदर्शन, स. 9वा. स्थानिक भजने, स. 10वा. महिलांचे हळदीकंकू समारंभ, दु.2.30वा. पुराण कथन श्री प्रकाश फडके, दु.3.30वा. किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर, राजापूर, रात्री 8वा. भोवती, आरती मानकरी शिवगण, सुतार, पेटकर, मुडेवाडी, रात्री 10.30वा.नाटय प्रयोग “बंध रेशमाचे” लेखक कै.श.ना. नवरे, सादरकर्ते -सिध्दाई कान्हाई रंगभूमी गावखडी.
दि.27 फेब्रुवारी रोजी स.7वा.अभिषेक, शिवपुजा, स.8वा. क्रिडा स्पर्धा, दु. 2वा. पुराण कथन श्री.प्रकाश फडके, दु.3वा. किर्तन ह.भ.प विद्याधर करंबळेकर, राजापूर, रात्री 8वा. भोवती, आरती मानकरी-कुंभारवाडी, रात्री 10.30वा. बक्षीस वितरण समारंभ, रात्री 11वा. नाटय प्रयोग “कडीपत्ता” लेखक अनिल काकडे सादरकर्ते-श्री .सुदर्शन धर्माजी तोडणकर. नाटय प्रयोग संपल्यावर पहाटे ललिताचा कार्यक्रम होणार आहे.
श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री महेश मेस्त्री आणि सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक यांच्या सर्वांच्या सहकार्याने श्री देव रामेश्वराचा उत्सव अतिशय भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रामेश्वर उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.