(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन असलेले आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिराला आता नवा साज चढणार आहे. या मंदिराच्या आतील भागात कामांची दुरुस्ती आणि मंदिराच्या कळसावर वॉटरप्रूफिंग आणि रंगरंगोटी करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती संस्थान श्री देव गणपतीपुळेचे सरपंच डॉक्टर श्रीराम केळकर यांनी दिली. गणपतीपुळे येथील स्वयंभू मंदिराच्या मुख्य कळसावर वॉटरप्रूफिंग आणि रंगरंगोटीचे काम हाती सध्या सुरू झाले आहे तसेच मंदिराच्या मुख्य कार्यालयातील बाहेरच्या बाजूने प्लास्टर करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानंतर सदर भागाला रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराने आत जाताना प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आकर्षक स्वरूपाचे कोरीव काम करण्यात आले आहे . त्याशिवाय संपूर्ण मंदिर परिसराच्या प्रदक्षिणा मार्गावर पूर्णपणे लादी टाकून प्रदक्षिणामार्ग आकर्षित करण्यात आला आहे तसेच मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या देवळ्यांची ही आकर्षक स्वरूपाची कामे करण्यात आले असून मंदिर परिसराच्या मुख्य मोरया गेटवरील देवळीचे काम येत्या काही दिवसात आकर्षक स्वरूपाचे करण्यात येणार असल्याची माहिती संस्थांन
कडून देण्यात आली आहे एकूणच गणपती मंदिरतील नव्या दुरुस्ती आणि रंगरंगुटीच्या कामामुळे या मंदिराला नवा साज येणार असल्याने स्वयंभू श्रींचे मंदिर अधिक आकर्षित होणार असल्याने विविध ठिकाणाहून येणाऱ्या भक्त व पर्यटकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.