( संगमेश्वर/ प्रतिनिधी )
तालुक्यातील माखजन येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी ( दिनांक 31/8/2024 ) साठे हॉल येथे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली माखजन पोलिस उपनिरीक्षक विवेक साळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला पंचक्रोशीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष आणि गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक साळवी यांनी कायदा सुव्यवस्था बिघडू नये यावर मोलाचे असे मार्गदर्शन केले. तसेच येणाऱ्या गणेशोत्सव सणात कोणत्याही ठिकाणी वाद-विवाद निर्माण होऊ नये, हा सण खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात पार पडावा, असे आवाहन साळवी यांनी उपस्थितांना केले.
तुरळ गावचे तंटामुक्ती अध्यक्ष आप्पाजी फडकले यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, सर्व गावामधील वाडीप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.