(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी तरवळ येथील रहिवासी उमेश दत्ताराम शिवगण या ४० वर्षीय कष्टाळू तरूणाने शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही. या सुविचाराचे महत्त्व जाणून घेऊन आपणही दहावी नापास झालो असलो तरी इ.बारावीपर्यंत शिक्षण घेण्याची जिद्द ठेवून उमेश शिवगण या ४० वर्षीय तरूणाने २० वर्षांनंतर ५७ /% गुण मिळवून बारावी उत्तीर्ण होण्याची आपली जिद्द पूर्णत्वास नेली आहे.
उमेश दत्ताराम शिवगण अतिशय गरीब घराण्यातील युवक .मिळेल ते काम करण्याची मनात दुर्दम्य इच्छाशक्ती. आपल्या परिसरातील विद्यार्थी दहावी- बारावी उत्तीर्ण होऊन विविध कोर्सला जातात, आपलं करिअर घडवतात हे त्यांनी डोळ्यासमोर पाहिले आणि आपणही जरी दहावी नापास झालो असलो तरी दहावीला बाहेरून परीक्षेला बसावे आणि दहावी पास व्हायचे या उद्देशाने सन २०२२ मध्ये उमेशने जाकादेवी केंद्रावर दहावीची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत तो दहावी परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाला.
दहावी नंतर मध्ये एक वर्ष गॅप देऊन सन फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये उमेश याने बारावी परीक्षेचा १७ नंबर फॉर्म भरला आणि उमेशने यावर्षी ५७ टक्के गुण मिळवून बारावी आर्ट शाखेतून उत्तीर्ण झाला.उमेशच्या या यशाबद्दल उमेशचे कुटुंबीयांसह परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिक, नातेवाईक यांनी त्याचे खास कौतुक केले. त्याच्या दुर्दम्य इच्छा शक्तीला दाद दिली. पदवीपर्यंत शिक्षण घेण्याचा मानस उमेश शिवगण या तरुणाने व्यक्त केला आहे. इच्छेला मूर्त स्वरूप देणाऱ्या जाकादेवी विद्यालयाचे व मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे उमेश शिवगण या युवकाने मनापासून धन्यवाद दिले.