(रत्नागिरी)
विमानाचे तिकिट बुक करताना अज्ञाताने बनावट वेबसाईटच्या आधारे फिर्यादीची ४६ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना १५ जानेवारी २०२३ रोजी रात्री ८.५१ १३ ते फेब्रुवारी रोजी ९.५८ वा. कालावधीत शिवाजीनगर येथे घडली आहे.
याबाबत विनय विष्णू देवरुखकर (रा. भोसले प्लाझा शिवाजीनगर, रत्नागिरी) यांनी एक महिन्यानंतर १२ मार्च रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, १५ जानेवारी २०२३ ते १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विनय देवरुखकर आपल्या घरातील लॅपटॉपवरून इंडिगो कंपनीमार्फत गोवा ते हैद्राबाद असे जाण्याचे व परतीचे तिकिट बुक करत होते. त्यावेळी अज्ञाताने ‘वाराफी डॉट कॉम’ ही बनावट वेबसाईट बनववून त्याच्या आधारे फिर्यादीकडून तिकिटााचे ४५ हजार ८०० रुपये क्रेडिट कार्डव्दारे ऑनलाईन पध्दतीने स्विकारुन फसवणूक केली.
दरम्यान, आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.