( जाकादेवी / वार्ताहर )
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करून रत्नागिरी विधानसभेची निवडणूक लढवणारे लोकप्रिय माजी आमदार तसेच उद्धव ठाकरे पक्षाचे विधान सभेचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब माने यांनी जाकादेवी येथील मतदारांची तसेच जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले. निवडणुकीत कार्यकर्ते, सर्व सामान्य लोकांना व मतदारांना ताकद देण्याच्या दृष्टीने त्यांची ही भेट महत्वपूर्ण ठरली.
जाकादेवी खालगाव परिसरातील सर्व सामान्य लोकांच्या,मतदारांच्या भावना समजून घेतल्या.यावेळी उपस्थितांना त्यांनी बहुमोल असे सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी बाळासाहेब माने यांनी जाकादेवी येथील कैलास भेलपूरी येथे भेल खाण्याचा आस्वाद घेतला. माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बाळासाहेब माने यांनी जाकादेवी येथे कैलास भेलपूरी येथे भेल खाण्याचा आस्वाद घेत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह उपस्थित नागरिकांना देखील अप्रुप वाटले. सर्वसामान्य लोकांमध्ये बसून लोकांचे प्रश्न सोडवणारे बाळासाहेब माने अशी बाळासाहेब माने यांची ख्याती आहे. बाळासाहेब माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांतही गावागावात कमालीचे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश या निवडणुकीत ते आशावादी असून कार्यकर्त्यांच्या आशा देखील पल्लवीत झाल्या आहेत .
जाकादेवी येथील भेटीप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी बंड्या साळवी, संजय पुनसकर यांच्यासमवेत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण उर्फ आप्पा घाणेकर, किसन घाणेकर, अनंत खापले, युवानेते व सामाजिक कार्यकर्ते अभय खेडेकर, युवा नेतृत्व कैलास खेडेकर, वैभव देसाई, रमाकांत देसाई, सुभाष रहाटे, किशोर घाणेकर, विनायक रेवाळे, दिपक कातकर, दिलीप गोताड, सचिन गोताड,तालुक्यातील पदाधिकारी यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नुकतेच निधन झालेल्या युवा कार्यकर्ते संदेश नंदकुमार खेऊर कुटुंबियांची त्यांनी भेट घेऊन खेऊर कुटुंबीयांचे बाळासाहेब माने यांनी सांत्वन केले.