(दापोली / सुदेश तांबे)
दापोली येथे काळकाई कोंड परिसरामध्ये राहत असलेले माजी नगरसेवक अनंत पवार यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
स्थानिकांच्या माहितीनुसार अनंत पवार यांच्या तब्येतीमध्ये अचानक गडबड झाल्याने ते चक्कर येऊन जमिनीवर पडले. त्यांना घरातील सदस्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून कुठच्याही प्रकारे प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारांच्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली.
अनंत पवार यांनी बौद्धजन सेवा संघ शाखा क्रमांक 41 माजी उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, माजी समाज कल्याण सभापती अशी अनेक पदे त्यांनी भूषविली होती. मात्र त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण काळकाई कोंड परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.