(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गणेशवाडी व गानसुरवाडी येथे देश स्वातंत्र्य झाल्यापासून एसटीची गाडी प्रथमच धावली आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैयाशेठ सामंत, उद्योजक अण्णा सामंत यांच्या सहकार्याने आणि ऋतुजा राजेश जाधव माजी सभापती समाज कल्याण समिती व जिल्हा नियोजन समिती सदस्य, जि.प.सदस्य वाटद यांच्या आग्रही मागणीनुसार व पाठपुराव्याने या वाड्यांमधून शाळेतली मुले, स्त्रिया, वृद्धांचे हाल थांबले आहेत. या ठिकाणी गेले बरेच दिवस एस.टी. सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. नुकतेच गानसुरवाडी येथील पुलाजवळ अण्णासाहेब सामंत उद्योगपती यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून एस.टी.च्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गावातील ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी यांनी आनंद व्यक्त केला.
एस.टी. सुरू होण्यासाठी सूचक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम फडकले, वासुदेव निंबरे, नरेश निंबरे, रवींद्र निंबरे, अशोक वीर, गणेश निंबरे, वेदिका निंबरे, गणपत वीर, कृष्णा फडकले, प्रकाश निंबरे, सदानंद निंबरे व अनेक ग्रामस्थ यांनी मागणी केली होती. तसेच गावातील लोकांनी या रस्त्यासाठी श्रमदानही केले होते. यावेळी रस्त्यातील काही दगडाचा भाग कटिंग करण्यासाठी जेसीबी लावून कटिंग करण्यात आला. याकामी वाटद येथील राजेश जाधव यांनी मदत केली. तसेच पाटील साहेब, प्रभुणे मॅडम, काळे साहेब, पवार, चव्हाण यांनी चांगले सहकार्य केले.
या ठिकाणी एसटी बस सेवा सुरू करण्याप्रसंगी जेष्ठ उद्योजक अण्णा सामंत, उद्योजक आनंदा मुळ्ये, रंजू मुळ्ये, सौ.ऋतुजा जाधव मा.सभापती समाज कल्याण समिती, बाबय कल्याणकर विभाग प्रमुख, अजीम भाई चिकटे, नामदेव चौगुले उपविभाग प्रमुख, नरेंद्र निंबरे युवा सेना अध्यक्ष, वेदिका फडकले, वासुदेव निंबरे, संदीप पवार सर्व गावकरी, मानकरी असंख्य महिला उपस्थित होत्या. याप्रसंगी मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर अण्णा सामंत यांच्या हस्ते एस.टी.ला हार घालून व श्रीफळ वाढवून आणि प्रवाशांना गोड पेढे देऊन मार्गस्थ करण्यात आली. या ठिकाणी अथक प्रयत्नाने व बऱ्याच वर्षानंतर एसटी सुरू झाल्याने आबालवृद्धानी पालकमंत्री उदय सामंत, सौ.ऋतुजा जाधव मॅडम यांचे आभार मानले आहेत.