(रत्नागिरी)
रेल्वे स्थानकावर घाई गडबडीत रेल्वे गाडीत चढताना फलटावर पडल्याने जखमी झालेला सॅन्डवीच विक्रेत्या तरुणाला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. थांब्यावर गाडी थांबायच्या अगोदर चढण्याच्या धडपडीत हा अपघात झाला. सुंदरकुमार चंद्रदीप सहानी (वय ३२, रा. पडवेवाडी-कुवारबाव, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे.
सदर घटना शनिवार १६ मार्च रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास कोकण रेल्वेच्या रत्नागिरी रेल्वे स्थानकावर घडली. सुंदरकुमार सहानी याचे खाद्य पदार्थ विक्री करणे हे उदरनिर्वाहाचे साधन होते. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर फलाट क्र. २ वर गाडी आल्याने सँडवीच विकण्यासाठी तो जात होता. गाडी थांबायच्या आधीच त्याने रेल्वे गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. प्रवासी उतरण्याच्या
अगोदरच खाद्य पदार्थ विक्री करणारे हे गाडीत चढत असतात तो घाई घाईतच फाटा क्र. २ वर आलेली गाडी पकडून चढत असताना त्याचा तोल जाऊन पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तो पर्यत प्रवाशांची गर्दीही तेथे जमली होती. रेल्वे पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना रात्री ९.३० च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. रेल्वे स्टेशन परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.