(रत्नागिरी)
संकल्प प्रतिष्ठान कणकवली संस्थेमार्फत गायत्री काजू फॅक्टरी एमआयडीसी रत्नागिरी येथे फ्लेवर्ड काजूगर आणि मूल्यवर्धित उत्पादने प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे आणि काजू उत्पादकांचे स्वागत करण्यात आले. श्री सावंत यांनी मसाला काजू, खारा काजू, चॉकलेट काजू, काजू कतली, काजू लाडू इत्यादी काजू पासून बनवण्यात येणाऱ्या उत्पादने बनवण्याबद्दल मार्गदर्शन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातून 45 काजू उद्योजकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. संस्थेचे अध्यक्ष श्री मुराद अली शेख यांनी काजूपासून वेगवेगळी उत्पादने तयार करून देशात आणि परदेशात विक्री करून आपले कोकण आर्थिक सक्षम करावे आणि कोकणात जास्तीत जास्त रोजगार निर्माण करावे असे आवाहन केले. कोकणी पदार्थांचे उत्पादन वाढले तरच कोकण प्रगत होईल. म्हणून कोकणात प्रशिक्षण कार्यक्रम जास्त प्रमाणात घेतले तर हजारो उद्योजक घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी गायत्री काजू फॅक्टरीच्या अध्यक्षा सौ प्राजक्ता वासावे, मार्गदर्शक श्री किरण वासावे आणि फॅक्टरीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.