(पुणे)
अगोदरच्या जमान्यात नागरिकांच्या अन्न, वस्र ,निवारा या गरजा मुलभूत होत्या. आता त्या बरोबरच मोबाईल फोन ही मोठी गरज झाली आहे. अन्न, वस्र नाही दिले तरी चालेल, पण मोबाईल पाहिजे अशी परिस्थिती सध्या समाजात झाली आहे. एखाद्या गेममध्ये टास्क दिला जातो आणि माणूस चौदाव्या मजल्यावरू उडी टाकतो. आपण सगळे या छोट्याशा बॅाक्समुळे वेडे झालो आहोत. मोबाईल जास्त वेळ वापल्यावर आपला कान दुखतो, तरी आपण तो कानालाच लावून धरतो. सध्या वैज्ञानिकांनी शोध लावला आहे की, पाच टक्के मेदूचे कॅन्सर हे मोबाईलमुळे झाले आहेत अशी धक्कादायक माहिती डॅा. तात्याराव लहाने यांनी प्रसंगी दिली.
‘सोमेश्वर फाऊंडेशन’ तर्फे आयोजित कार्यसम्राट मोफत महा- आरोग्य शिबीराचे उदघाटन रविरवार (ता.4) सकाळी, शासकीय कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर या ठिकाणी झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री डॅा. तात्याराव लहाणे बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, नागरिकांनी मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला. तसेच आरोग्य विषयी काळजी कशी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन केले.
दिवंगत आमदार विनायक निम्हण आणि माझी मैत्री वैचारिक भांडणातून झाली हे सांगून डॅा. लहाने यांनी दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या आठवणींना उजाळा दिला. धो -धो पावसातही तपासणीसाठी बस भरून व्यक्ती येत आहेत. सोळा स्पेशालिटी, आठ सुपर स्पेशालिटी रुग्णालयांतील तज्ज्ञ डाॅक्टर रुग्णांना तपासत आहेत. तर आलेल्या प्रत्येकाला खरी सुखरूप सोडले जात असून, आरोग्याविषयी कामासाठी सनी निम्हण यांचे अभिनंदन. सनी निम्हण यांनी विनायकरावांच्या पावलावर पाऊल ठेवत आता आमदार पदावर जायला काही हरकत नाही, अशा भावना डाॅ. लहाने यांनी यावेळी व्यक्त केल्या.