(चिपळूण)
सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेडी चिंचघरी सती विद्यालयातील पंधरा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण जिल्हा गुणवत्ता यादीत रुद्र मारुती भंडारे 39 वा,गार्गी किरण मोरे 81 वी, सुयश सुभाष पवार 144 वे स्थान पटविण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत इयत्ता आठवीमधील जिल्हा ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सेजल संजय भोसले 17 वी,अमृता अजित चव्हाण 23 वी,अनुजा शैलेश लंबाडे 28 वी,योजना लाडू राऊळ 31 वी,प्रांजल दशरथ आंबेडे 41 वा,मनस्वी पर्शुराम सुर्वे 44 वी,शौर्य नरेश पावसकर 47 वा,वेदांत दिलीप कदम 72वा,प्रांजली महेश शिंदे 91वी,शहरी सर्वसाधारण तालुका गुणवत्ता यादीत श्रेया विनोद मोडक तिसरी,संचाली प्रवीण कांबळे चौथी,ग्रामीण अनुसूचित जाती अंतरा सुशील गमरे पहिला क्रमांक प्राप्त करून यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख आनंद भुवड,सौ स्मिता भालेकर,दिपक भुवड,स्नेहल भोसले,समीर पिलवलकर,स्नेहलता वरेकर,मुसा काद्री, सतीश पालकर,योगेश नाचणकर,शर्मिला म्हादे यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष,आमदार श्री. शेखरजी निकम सर,संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब भुवड,संस्थेचे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक,संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.शांताराम खानविलकर,सौ.पुजाताई निकम माजी सभापती पंचायत समिती चिपळूण,संस्थेचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर,उपमुख्याध्यापक श्री.विश्वास दाभोळकर,पर्यवेक्षक श्री.पांडुरंग पाटील, पर्यवेक्षिका सौ.आसावरी राजेशिर्के,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,सर्व शालेय समित्या व ग्रामस्थ यांच्यावतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.