(लांजा)
चिरा वाहतूक करणारा भरधाव वेग असलेला ट्रक रेल्वे पुलाला जाऊन धडकल्याने या अपघातात ट्रक चालकासह क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. लांजा दाभोळे मार्गावरील तळवडे गावातील रेल्वे पुलाजवळ हा अपघात सोमवारी १२ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
लांजा आसगे तळवडे-दाभोळे मार्गावर क्षमतेपेक्षा जादा चिरा वाहतूक करणाऱ्या ट्रकला सोमवार रात्री अपघात होऊन चालकासह क्लीनर असे दोन दोनजण जागीच ठार झाल्याची घटना तळवडे कुरूचुंब रेल्वे ब्रिज येथे झाली. या या अपघातात चालक कमलाकर भागप्पा केंगार (28 रा पांणाझरी जत सांगली) आणि कमलाकर गेजगे (17 बोलबड जत सांगली) यांचा जागीच मृत्यू झाला.
सोमवारी रात्री साडेआठ वाजता तळवडे रेल्वे उतारावर चालकाचा ताबा सुटून ट्रक क्रमांक के.ए. 28 डी 5312 हा रेल्वे पुलाच्या कठड्यावर जाऊन आढळला. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक चिरा होता असल्याचे समजते. हा ट्रक सापुचेतळे येथील चिरा खणीवरून वरून चिरा घेऊन सांगली येथे निघाला असताना हा अपघात झाला.
या अपघाताची खबर तळवडे येथील पोलीस पाटील प्रदीप पाटोळे यांनी लांजा पोलिसांना दिली. तळवडे बीटचे पोलिस अंमलदार श्री. भुजबळ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
लांजा तालुक्यातील विविध पक्षांनी लांजा आसगे तळवडे-दाभोळे मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी, अशी मागणी सातत्याने केली आहे. क्षमतेपेक्षा मालवाहतूक होत असल्याने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही बिनदिक्कतपणे आजही या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू आहे.
या अपघाताची नोंद यांचा लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर भारतीय न्या.सं. २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब), ३२४ (३) मोठा वाहन अधिनियम कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे करत आहेत.