(लांजा)
तालुक्यातही दरवर्षी अनेक ठिकाणी वणवे लागण्याचे प्रमाण वाढत आहे याही वर्षी लांजा तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वणवे लागल्याचे दिसून आले आहे. या आगीत नैसर्गिक साधन संपत्ती व जैव विविधतेचे होणारे नुकसान ही आता चिंतेची बाब बनली आहे. यावर योग्य उपाययोजना शासनाने कराव्यात आणि नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
वणव्यांमुळे लाखोंच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होताना दिसून येते. तसेच यामध्ये जैवविविधता नष्ट होते. दरवर्षी मार्च ते मे महिन्यात उद्भवणारी ही समस्या संपता संपत नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे डोंगरांना वनवे लागण्याचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे. दरवर्षी वणव्यात वनसंपदा जळून खाक होत असल्याने या समस्ये च्या मुळापर्यंत जाऊन कार्यवाहीची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षी डोंगरावर लागलेल्या आगीत जंगली झाडे, औषधी वनस्पती, लहान पक्षी, प्राणी, इत्यादी चा नाहक बळी जातो.
आंबा, काजू, नारळी, पोपळी, या आगीत होरपळलेली दिसून येतात आणि याचा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसतो दरवर्षी वणवे लागत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावली जाते की अचानक लागते याचे कोडे मात्र अद्याप उलगडलेले नाही. त्याचाही शोध घेऊन जर यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आढळून आल्यास अशा लोकांना वणव्यापासून आपली काजू, नारळ, पोकळी, आंबा, व अन्य फळे देणारी झाडे वाचवण्याच्या दृष्टीने आता जनजागृती ची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना द्यावी.