(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील कोळीसरे बौद्धवाडी येथील प्रसिद्ध नाट्य कलाकाक्ष व नाट्य दिग्दर्शक व बौद्धजन पंचायत समिती कोळीसरे मुंबईचे शाखेचे माजी अध्यक्ष रामचंद्र तानू सावंत यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी दि.१५ फेब्रुवारी रोजी कोळीसरे येथे निधन झाले.
दिवंगत रामचंद्र सावंत यांनी त्याकाळी जिद्दीने ९ वी पर्यंत शिक्षण घेतले. तदनंतर ते मुंबईत एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांनी शैक्षणिक व सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केले. ते अतिशय प्रेमळ सुसभावी आणि परोपकारी व्यक्तिमत्त्व होते.एवढेच नव्हे तर नाट्य दिग्दर्शक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक मोठमोठ्या नाटकांना डायरेक्शन केले. त्यांनी अनेक कलाकार घडविले. त्यांची शोकसभा व पुण्यानुमोदन विधी बुधवार दि.२१ रोजी होणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल कोळीसरे पंचक्रोशीतून दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, जावई, नातवंडे असा परिवार आहे.