(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव बौध्दवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक व प्रसिद्ध बांधकामी रामचंद्र हरी जाधव (रामभाऊ) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी मंगळवार दि.२० रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
शिरगाव गावात रामभाऊ या नावाने सुपरिचित होते. इमारत बांधकामामध्ये ते निष्णांत होते. कमीजागेत कल्पकता वापरून इमारतीचे बांधकाम करण्यात त्यांचा हातखंडा होता. बांधकाम क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्त्व म्हणून ते पंचक्रोशीत ओळखले जात. शिरगाव व परिसरात त्यांनी त्याकाळी अनेक इमारतींची उत्तम बांधकामे केलेली आहेत. बांधकामाशिवाय त्यांना सामाजिक व धार्मिक कार्यातही प्रचंड आवड होती.
सन १९५७ साली शिरगाव येथे झालेल्या दीक्षांत कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. कबड्डी व क्रिकेट खेळात त्यांनी नैपुण्य मिळवले होते.ॲड शिवराज जाधव यांचे ते वडील होत.त्यांचा शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि.३ मार्च रोजी होणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल शिरगाव परिसरातून दुःख व्यक्त होत आहे.