(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहली येण्यास प्रारंभ झाला आहे. या ठिकाणी असलेले भुरळ पाडणारे निसर्गसौंदर्य आणि येथील अथांग पसरलेला विलोभनीय समुद्रकिनारा पर्यटकांना विशेष पुरळ पाडतो, या कारणांनी शालेय विद्यार्थ्यांना देखील येथील निसर्ग सौंदर्याचे आणि येथील पर्यटन स्थळाची विशेष माहिती देण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या शाळांच्या सहली गणपतीपुळेला येत असतात. गतवर्षीप्रमाणे यंदा देखील या सहलींचा प्रारंभ झाला असून गेल्या दोन दिवसात शालेय सहलींची संख्या वाढलेली दिसून येत आहे.
एकूणच गतवर्षीप्रमाणे यंदाही शालेय मुलांच्या सहलींची विशेष पसंती गणपतीपुळेला मिळेल अशा आशावाद व्यक्त केला जात आहे. एकूणच गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात येणाऱ्या शालेय मुलांच्या सहलीमुळे येथील सर्वच लहान मोठ्या व्यवसायिकांना अधिक प्रमाणात आर्थिक फायदा होतो त्यातून अनेक त्यातूनच अनेकांची रोजीरोटी सुटल्याचे मत व्यक्त केले जाते.
या सहलींमध्ये येणारे विद्यार्थी येथील देवदर्शनाबरोबरच समुद्र स्नानाचा विशेष आनंद लुटत असल्याचे चित्र दिसून येते तसेच तसेच या ठिकाणी येणाऱ्या सहलींच्या विद्यार्थ्यांना येथील रमणीय समुद्रकिनाऱ्यावर असलेले वॉटर स्पोर्ट, उंट, घोडे सफर एटीव्ही बाईक व पर्यटकांसाठी असलेले विविध पर्यटनात्मक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात त्यामुळे शालेय मुलांना या ठिकाणी अन्य पर्यटन स्थळांपेक्षा एक वेगळा आनंद घेता येत असल्याचे सहलींबरोबर येणाऱ्या शिक्षकांकडून सांगितले जाते.एकूणच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या जिल्ह्यांमधून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहलींचा प्रारंभ झाला असून या सहलींमध्ये दिवसेंदिवस आता वाढ होत जाईल, असे स्थानिक व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.