(रत्नागिरी)
रत्नागिरीत धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास घडली. जिल्हा न्यायालयाच्या आवारात दोघांनी एकावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ माजली असून चौकाचौकात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा न्यायालयात आज एका केससंदर्भात प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर आले होते. या केसवेळी उपस्थित असलेले योगेश चाळके यांच्यावर दोघांनी कोयतीने हल्ला केला. स्वरुप राऊत व जयसिंग राऊत अशी दोघांची नावे असल्याचे समजते. जखमी योगेश चाळके यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान न्यायालयाच्या आवारात कोयती घेऊन गेले यामुळे पोलिसांनी स्वरुप राऊत आणि जयसिंग राऊत या दोघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास शहर पोलीसांकडून केला जात आहे.