(रत्नागिरी)
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बंडखोरी केलेले ठाकरे गटाचे नेते उदय बने यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी त्यांची नाराजी मात्र संपलेली नाही. पक्षात इतक्या ३९ वर्षे निष्ठेने काम करूनही आपल्याला योग्य ती जबाबदारी देणे सातत्याने टाळण्यात आले. त्यामुळे माझी कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पात्रता नसेल किंवा आवश्यकता वाटत नसेल, म्हणूनच असे करण्यात आले असावे. त्यामुळे मी आता उबाठा पक्षाचे काम थांबवित आहे, अशी प्रतिक्रिया उदय बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.
त्यामुळे उदय बने यांचे उद्धव ठाकरे गटातील बंड प्रथमदर्शनी शमलेले वाटत असले तरी त्यांची पक्षातील नाराजी पाहता आणि पक्षाचे काम थांबविणार असल्याचे त्यांचे वक्तव्य लक्षात घेता वेगळ्या राजकीय मार्गाने जाण्याचा संकेत त्यांनी आपल्या या वक्तव्यातून दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे बने आता कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेणार याची चर्चा सुरू झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून यावेळी उद्धव ठाकरे गटातर्फे बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक आणि उदय बने हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. उदय बने यांनी तर गेली 40 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेबरोबर निष्ठा राखली होती. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ही तितक्याच निष्ठेने त्यांनी वाटचाल केली. मातोश्री वरून आलेला प्रत्येक आदेश त्यानी पाळला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळीही त्यांनी आलेला अप्रिय आदेश पाळला. त्यामुळे ते ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते आणि जाण्याचा संकेत त्यांनी आपल्या या वक्तव्यातून दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे बने आता कोणत्या राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेणार याची चर्चा सुरू झाली आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून यावेळी उद्धव ठाकरे गटातर्फे बंड्या साळवी, राजेंद्र महाडिक आणि उदय बने हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. उदय बने यांनी तर गेली 40 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेबरोबर निष्ठा राखली होती. त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ही तितक्याच निष्ठेने त्यांनी वाटचाल केली. मातोश्री वरून आलेला प्रत्येक आदेश त्यानी पाळला होता. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी ही त्यांनी आलेला अप्रिय आदेश पाळला. त्यामुळे ते ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते आणि यावेळी त्यांना निश्चितपणाने रत्नागिरी विधानसभेची उमेदवारी मिळेल, असा विश्वास वाटत होता.
कोणता झेंडा हाती घेणार ? याकडे लक्ष
शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उबाठा तर्फे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र आयत्यावेळी पक्षाबाहेरून अर्थात भाजपमधून आलेले माजी आमदार बाळ माने यांना रत्नागिरी येथून उदय सामंत यांच्या विरोधात उबाठातर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर नाराज उदय बने रत्नागिरीत अपक्ष म्हणून आपली उमेदवारी दाखल केला होता. त्यामुळे ही बंडखोरी त्यांनी मागे घेतली असली तरी त्यांचे एकूणच तेवर पाहता, प्रचंड नाराजी पाहता ते आता दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतील असा अंदाज व्यक्त होत आहे.