(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाची महत्वपूर्ण गरज ओळखून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला नामांकित कंपनीचे ३ स्मार्ट टी.व्ही इ.दहावी व इ.बारावी बॅचकडून प्रदान करण्यात आले.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे धडाडीचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालय डिजिटल करण्याचा संकल्प मांडला. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्मार्ट टी.व्ही. देण्याबाबत विद्यालयाने आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत इ. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची गरज लक्षात घेऊन दर्जेदार कंपनीचे ३ स्मार्ट टी.व्ही. (४२ इंची) देण्यात आले. या देणगीबद्दल मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, शाळेचे सी.ई.ओ. किशोर पाटील, शिक्षण संस्थेचे उपक्रमशील चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक यांनी देणगीदार विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले. हा कार्यक्रम मालगुंड एजुकेशन सोसायटीचे चेअरमन सुनिल मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
इ. १० वी,१२वी शुभेच्छा समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी शाळेला स्मार्ट टी.व्ही. ची देणगी दिली.यावेळी शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर, विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे , पर्यवेक्षक शाम महाकाळ, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अर्जुन माचिवले, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार ,शिक्षक प्रतिनिधी संतोष सनगरे, शिक्षक प्रतिनिधी अरुण कांबळे, परीक्षा विभागप्रमुख केशव राठोड, अभ्यास शिबिर प्रमुख अमित बोले, अनिल पाटील, महेश राडे, अमित गवई, संदीप कुराडे यांसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.शाळा व कनिष्ठ महाविद्यालय डिजिटल करण्याचा संकल्प बंधू मयेकर यांनी हाती घेतला आहे. यावर्षीपासून शालेय क्लासमध्ये स्मार्ट टी.व्ही. बसवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.