(चिपळूण)
न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती या विद्यालयात गुरुवार दिनांक 27/6/2024 रोजी विज्ञान छंद मंडळ व हरित सेना मंडळाची स्थापना करण्यात आली व सविचार सभा घेण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ सावंत आर.आर यांनी केले. त्यांनी विज्ञानछंद मंडळ स्थापन करण्यामागचा हेतू व उद्देश विद्यार्थ्यांना समजावून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय वरेकर होते. विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवला पाहिजे असे मत मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.यानंतर विज्ञान शिक्षक श्री.शिवाजी पाटील यांनी विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती वाढवावी आणि विज्ञानातील संशोधक निर्माण व्हावे यासाठी विज्ञानाच्या विविध स्पर्धेत सहभाग घेत जिज्ञासू वृत्तीचे दर्शन घडवावे तसेच विविध विज्ञान प्रकल्प,भारतीय शास्त्रज्ञांच्या शोधाचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार करावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. व मंडळाची कार्यकारिणी,व पदांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय वरेकर,विज्ञान विषय प्रमुख श्री सूर्यवंशी ए.के., हरित सेना व विज्ञान छंद मंडळ प्रमुख सौ.राजश्री सावंत, पर्यावरण मंडळ प्रमुख श्री.शिवाजी पाटील,सौ.सुलोचना जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवाजी पाटील व आभार सौ. राजश्री सावंत यांनी केले.