(देवरूख / सुरेश सप्रे)
सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अनेक राजकीय पक्षाला खिंडार पडत असून संगमेश्वर तालुक्यातील मुचरी पंचायत समिती गणातील काटवली ढोसळवाडीतील माजी उपसरपंच बाळकृष्ण उबारे व मुंबई अध्यक्ष पांडुरंग मांडवकर यांचेसह असंख्य ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांच्याकार्य प्रणालीवर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजितदादा गट) प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी पक्षाची बांधणी करण्यासाठी जे जे करावे लागेल ते प्रामाणिकपणे करण्याचे काम राष्ट्रवादी पक्षाचा नेता म्हणून मी करणार असल्याचा शब्द यावेळी आ. निकम यांनी कार्यकत्यांना दिला आहे. तसेच इतर राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी पार्टीत येण्याच्या मार्गांवर असून लवकरच मोठा राजकीय भूकंप या मतदार संघात होणार असल्याचे सुतोवाच निकम यांनी बोलताना केले.
मतदार संघात आमदारांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहू लागली असून त्यांचे काम पाहून तसेच काटवली ठेसाळवाडी येथील अत्यंत गरजेचा असणारा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडल्याने काटवली ढोसळवाडीतील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजितदादा गटात) प्रवेश केला असल्याचे माजी सरपंच उबारे यांनी सांगितले.
प्रवेश कार्यकत्यामध्ये जयराम घवाळी, आत्माराम कळंबटे, गोविंद मांडवकर, अर्जुन कळंबटे, चंद्रकांत उबारे, सुनिल उबारे, एकनाथ उबारे, संतोष उबारे, संदिप कळंबटे, गंगाराम घवाळी, संजय कळंबटे, मंगेश मांडवकर, भागोजी कळंबटे, शिवराम गेल्ये, काशिराम मांडवकर, अनंत कळंबटे, अमित घवाळी, सुरज घवाळी, योगेश कळंबटे, दिपक जुवळे, सलोनी घवाळी, सुलभा उबारे, अरपित उबारे, अपुर्णा उबारे, सुनिल कळंबटे, शशिकला उबारे, अनिता उबारे, वनिता कळंबटे, प्रतिभा घवाळी, अपुर्णा मांडवकर, अनिता मांडवकर यांचा समावेश होता.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती पूजा निकम, सई निकम, महिला तालुका अध्यक्षा मानसी करंबेळे, संकेत खामकर, अनिल नांदळजकर, महेश नांदळजकर, मंगेश बांडागळे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील विविध पक्षातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते (अजितदादा गट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यासाठी आतुर असून पुढील काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे नितीन भोसले व बाळू ढवळे यांनी बोलताना सांगितले.