(रत्नागिरी)
रत्नागिरीच्या इतिहासात भर पडण्यासाठी आणि रत्नागिरीच्या प्रभात ७ मधील जनतेसाठी २ कोटी रुपये खर्च करून वैशिष्ट्यपूर्ण निधी योजने अंतर्गत आनंद नगरमध्ये ४२ गुंठयात उद्यान उभे करण्यात आले असून त्यांचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. रत्नागिरी शहराला जगातील लोक भविष्यात भेट देणार असलेली रत्नागिरी येत्या काळात मी घडणार असल्याचा शब्द उदय सामंत यांनी दिला आहे.
आपल्या रत्नागिरी शहरासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हवा तेवढा निधी दिला, त्यांचे सर्वात जास्त आभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमा दरम्यान सांगितले. रत्नागिरीमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने कायापालट करणार असल्याचा शब्द पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. जे उद्यान लोकांसाठी उघडले आहे त्यांच्या माध्यमातून आनंद घ्यावा असे आहावान पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख राहुल पंडित, उपजिल्हा प्रमुख राजन शेट्ये, महिला जिल्हा प्रमुख शिल्पाताई सुर्वे, स्मितलताई पावसकर, तालुका प्रमुख बाबू म्हाप, सुदेश मयेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार बाबर, बारक्या हळदनकर, दिशा साळवी, पूजा पवार, बाळू साळवी, श्रद्धा हळदणकर आदी उपस्थित होते.