(चिपळूण)
शहरातील बेंदरकर आळी येथे नाझनीन पार्क सोसायटीतील शबनम अपार्टमेंट इमारतीच्या तळ मजल्यावरील सदनिका नं. १ या ठिकाणी जनता सहाकारी बँकेने तारणपोटी सील केलेली मालमत्ता कर्जदार व गहाणखतदार यांनी बँकेला कोणतीही पूर्व कल्पना न देता आपअधिकाराने सदर मिळकतीच्या दरवाजाला लावलेले कुलुप सील तोडून, नोटीस फाडून सदर सदनिकेत अनाधिकारे प्रवेश केला म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यात ५ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे.
श्रीरंग मोहन चितळे (३३. रा. : चितळे मंगल कार्यालय, नवीन भैरी देवळाजवळ, बेंदरकरआळी चिपळूण) यांनी फिर्याद दिल्यानुसार जनता सहाकारी बँक लि. पुणे, शाखा चिपळूण यांनी आरोपी १) सलीम चांद मुलाणी, २) एक महीला, ३) अल्ताफ चांद मुलाणी, ४) अस्लम चांद मुलाणी (सर्व रा. नाझनीन पार्क सोसायटी शबनम अपार्टमेंट, तळमजला, चिपळूण) यांची जप्त केलेली स्थावर मिळकतीची पाहाणी केली असता बँकेचे थकीत कर्जदार आरोपी नं. १ व गहाणखतदार आरोपीत नं. २ ते ४ यांनी कर्ज थकविल्याने त्यानी कर्जास तारण म्हणून नगर परिषद हद्दीतील मिळकतीचा कायदेशीर ताबा बँकेने घेऊन ती मिळकत कुलुप बंद करून त्यावर सील करून तशी नोटीस दरवाजावर चिकटवली असतानाही कर्जदार व गहाणखतदार यांनी बँकेला कोणतीही पूर्व कल्पना न देता आपअधिकाराने सदर मिळकतीचे दरवाजाला लावलेले कुलुप सील तोडून नोटीस फाडून सदर सदनिकेत अनाधिकारे प्रवेश केला म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहेत.